मुंबई : शीना बोरा हत्याकांड बरंच रंगलं. अनेक दिवस या हत्याकांडाची चर्चा लोकांमध्ये होती. या प्रकरणात असलेला गुंतागुत समझून घेण्यास देखील अनेकांना बराच वेळ लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीना बोरा हत्याकांडावर आता सिनेमा येत आहे. पण या सिनेमावर पीटर मुखर्जी यांच्या वकीलाने केंद्रीय सेन्सॉर बोर्डला नोटीस पाठवली आहे. शीना बोरा हत्याकांडावर आधारित बनवण्यात आलेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी यात केली आहे.


चित्रपटात पीटर मुखर्जीला चुकीच्या पध्दतीने दाखवले जाऊ शकते. त्यामुळे हा चित्रपट आधी त्यांना दाखवण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकिलाने केली आहे. जोपर्यंत चित्रपट दाखवण्यात येत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी करण्यात आली आहे.


शीना बोरा हत्या प्रकरणावर बनलेल्या  'डार्क चॉकलेट'  चित्रपटात महिमा चौधरी, इशानी बैनर्जी आणि रिया सेन, रीना वर्धन हे मुख्य भूमिकेत आहेत. बंगाली दिग्दर्शक अग्निदेव चटर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 


पाहा ट्रेलर