मुंबई : 'गानसरस्वती' किशोरीताई आमोणकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून आदरांजली वाहिलीय. 'किशोरीताईंच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगिताची कधीही भरून न येणारी हानी झालीय. त्यांच्या निधनानं अपार दु:ख झाल्याचं' मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच, किशोरीतार्ईंच्या संगितातील मोलाच्या कार्याला अर्पण केलेली अमोल पालेकर यांनी चित्रित केलेला 'भिन्न शादजा' हा व्हिडिओही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय.  


 




गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८४ व्या वर्षांच्या होत्या. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी रविंद्र नाट्यमंदिरात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. सायंकाळी दादर चौपाटी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.