३७०० कोटींचा गंडा, सनी लिऑनीची होऊ शकते चौकशी
३७०० कोटींच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात सनी लिऑनच्या अडचणी वाढू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलीस सनी लिऑनीला चौकशीसाठी दिल्ली किंवा नोएडाला बोलावू शकते.
लखनऊ : ३७०० कोटींच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात सनी लिऑनच्या अडचणी वाढू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलीस सनी लिऑनीला चौकशीसाठी दिल्ली किंवा नोएडाला बोलावू शकते.
सोशल ट्रेडिंगच्या नावावर घर बसल्या एका क्लिकवर लाखो रुपये कमावण्याची लालच देवून सात लाख लोकांना ३७०० कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात ED ने अनुभव मित्तल विरोधात चौकशी सुरु केली आहे.
या प्रकरणात आता उत्तर प्रदेश पोलीस अभिनेत्री सनी लिऑनीची चौकशी करु शकते. मित्तलने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्रेटर नोएडाच्या एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये त्याने एक वेबसाइट लॉन्चसाठी अभिनेत्री सनी लिऑनीला आमंत्रित केलं होतं. ६ फेब्रुवारीला STF ने त्या हॉटेल कर्मचाऱ्याची चौकशी केली जेथे लॉन्च पार्टी ठेवली होती.