मुंबई : पॉर्नस्टार म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेली सनी लिओनीला सध्या बॉलीवूड तसेच भारतात प्रेम मिळत असले तर पॉर्नस्टार नदिया अलीसोबत मात्र असे काही घडत नाहीये. पाकिस्तानी सनी लिओनी अशी नदिया अलीची ओळख आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तिच्याच देशात तिच्यावर बंदी घालण्यात आलीये. इतकंच नाही तर नदियाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्यात. सोशल साईट्स तसेच ईमेलद्वारे नदियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. हिजाब घालून ती पॉर्न फिल्ममध्ये काम करत असल्याने तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताहेत.  


मात्र महिला किती सक्षम आहेत याची जाणीव त्यांना व्हावी यासाठीच ती पॉर्न फिल्मध्ये हिजाब घालून वावरत असल्याचे नादियाचे म्हणणे आहे. 


दरम्यान, नदियाच्या या कामाबद्दल तिच्या घरच्यांना सर्व माहिती आहे. त्यांना तिच्या कामाबद्दल कोणताच आक्षेप नाही. मात्र त्यानंतरही इतरांकडून तिच्यावर बंदी घालण्यात येत असल्याचे नादियाचे म्हणणे आहे.