हैदराबाद : 'बाहुबली' सिनेमातून गाजलेली जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 'साहो' सिनेमामधून ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता. यासाठी दीपिका, कॅटरिना आणि श्रद्धा कपूर यांच्याशी बोलणं देखील झालं पण त्यांची फी इतकी जास्त होती की निर्मात्यांनी अनुष्का शेट्टीला या सिनेमासाठी विचारलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शेट्टी आणि प्रभास या दोघांची फी निर्मात्यांना मान्य झाल्यानंतर दोघांना या सिनेमासाठी निवडलं गेलं. बाहुबली २ मध्ये अनुष्का आणि प्रभासच्या जो़डीने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. त्यांची जादू पुन्हा या सिनेमात चालतो का पाहावं लागेल.


साहो सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनुष्का शेट्टी आणि प्रभासला निवडल्यानंतर आता ही जोडी सिनेमाला किती यश मिळवून देते हे पाहावं लागेल.