मुंबई : बाहुबली-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातला बाहुबली प्रभासनं आमिर, शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं आहे. सगळं जग ज्याच्यावर फिदा आहे तो प्रभास आता विवाह बंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रभास लग्न करणार असल्याची माहिती एका हिंदी वेबसाईटनं दिली आहे. प्रभासची होणारी बायको ही अभिनेत्री किंवा फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेली गेली नाही.


प्रभासची होणारी बायकोही इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असून ती प्रभासपेक्षा १३ वर्ष छोटी आहे. प्रभास आणि मुलीच्या घरच्यांनी हे लग्न ठरवलं आहे. प्रभासच्या लग्नाच्या या चर्चा सुरु झाल्या असल्या तरी त्यानं किंवा त्याच्या घरच्यांनी याबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.