राहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या : प्रत्युषाचे वडील
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी बॉयफ्रेंड राहुल राजसिंगवर फसवणुकीचा आरोप केलाय.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी बॉयफ्रेंड राहुल राजसिंगवर फसवणुकीचा आरोप केलाय. प्रत्युषाचे वडिलांनी म्हटलेय, राहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे. त्याला फाशी दिली पाहिजे किंवा जन्मठेप. एक पत्रकार परिषद घेऊन दोघांनी हे आरोप केलेत.
राहुलच्या जाळ्यात प्रत्युषा फसली
त्यांनी यावेळी सांगितले, राहुलच्या जाळ्यात प्रत्यूषा फसली. राहुलचे अनेक मुलींशी संबंध होते. तो माजी प्रेयसीसह प्रत्युषाला मारहाण करीत असे. प्रत्युषा मनमिळावू मुलगी होती. ती आत्महत्या करू शकत नाही. प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी यांनी सांगितले, पोलीस आणि न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल.
आधीच राहुल विवाहित होता
प्रत्युषा बॅनजीचा कथित प्रेमी राहुल राजसिंग यांच्याबद्दल नवा खुलासा समोर आलाय. तो विवाहित होता. त्याची पत्नी कोलकातामध्ये राहत आहे. ज्यावेळी तिला याची माहिती मिळाली. त्यानंतर ती हे सहन करु शकली नाही आणि तिने आत्महत्या केली. त्यामुळे राहुलच्या अडचणीत वाढ झालेय.