लॉस एंजेलिस : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राने आज लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थिती लावली. जुहेर मुराद या लेबनीज फॅशन डिझायनरने तयार केलेल्या पांढऱ्या गाऊनमधील प्रियंकाने आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्वाँटिको' या मालिकेच्या माध्यमातून तिने अमेरिकी ग्लॅमर दुनियेत प्रवेश केला. त्यानंतर तिला आज ऑस्करचा एक पुरस्कार प्रदान करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.



प्रियंकाने आज घातलेला पांढरा गाऊन रेड कार्पेटवर उठून दिसला. त्यावर तिने परिधान केलेले हिऱ्यांचे दागिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या एका फोटोत 'हिरे हे मुलींचे बेस्ट फ्रेंड्स असतात' अशी कमेंटही तिने पोस्ट केलेय.


ऑस्कर सोहळ्यात पहिल्यांदा भाग घेणाऱ्या प्रियंकाने मात्र आपण थो़डे नर्व्हस असल्याचे सांगितले. विजेत्याचे नाव घोषित करताना आपण गोंधळून जायला नको, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.