न्यूयॉर्क : पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा आता युनीसेफ ग्लोबल गुडवील एम्बॅसिडर झालीय. या माध्यमातून ती मुलांच्या हक्कंविषयी समाजात जागरुकता निर्माण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका राष्ट्रीय पातळीवर युनीसेफसोबत काम करतेय. युनीसेफची गुडवील एम्बॅसिडर म्हणून ती काम करतेय. पण आता हेच काम ती आंतरराष्ट्रीय पातऴीवर नेताना दिसणार आहे. या 'कॉन्टिगो स्टार'नं युनीसेफच्या सत्तरीनिमित्त आयोजित कार्याक्रमाला हजेरी लावली होती. 


न्यूयॉर्कमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला फूटबॉल प्लेअर डेव्हिड बेक्हॅम, ओरलॅन्डो ब्लूम, जॅकी चॅन आणि मिली बॉबी ब्राऊन यांनी हजेरी लावली होती.