मुंबई : सलमान खानने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केल्याने तो वादात सापडला होता. सुल्तानच्या शूटिंगचा अनुभव त्याने एका बलात्काराच्या पीडितेशी जोडला होता त्यामुळे सलमानच्या या वक्तव्याचा अनेकांनी चांगलाच समाचार घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडची स्टार प्रियंका चोपडाने देखील सलमानच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जेव्हा तिला प्रश्न करण्यात आला तेव्हा ती भडकली आणि बोलली की 'हा प्रश्न ज्याने हे वक्तव्य केलं त्याला विचारला पाहिजे. एक स्त्री आणि मीडियाच्या नात्याने आपल्याला आपल्या पावरचा चांगल्या कामांसाठी उपयोग केला पाहिजे. देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत. महिलांशी संबंधित समस्यांवर लक्ष देण्याची गरज आहे.'


'बिहारमध्ये काही ठिकाणी महिलांवर बलात्कार झाले. यावर कोणी बोलत नाही. सलमानच्या वक्तव्यावर आधीच खूप वाद झाला आहे आता मला यावर काही बोलायचं नाही.' असं देखील प्रियंका म्हणाली.