मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये डंका वाजवून भारतात परतली आहे. भारतात परतल्यावर प्रियांका कोणता सिनेमा साईन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता प्रियांकाने तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाने चोप्राने नवा बॉलिवूडचा सिनेमा साईन केला असून अंतराळवीर कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये प्रियांका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नवोदित दिग्दर्शिका प्रिया मिश्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून हॉलिवूडच्या तोडीस तोड हा सिनेमा असणार आहे. गेल्या 7 वर्षांपासून प्रिया या प्रोजेक्टवर काम करतेय.