नवी दिल्ली : बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री प्रियंका चोप्राने ८८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपले जलवे दाखवले. यावेळी ती पुरस्कार समारोहात रेड कार्पेटवर दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाने ऑस्कर सोहळ्यासाठी खास सफेद ऑफ शोल्डर गाऊन घातला होतो. मात्र या सगळ्यात अधिक चर्चा होतेय ती प्रियंकाच्या ज्वेलरीची. 


मीडिया रिपोर्टनुसार तिने यावेळी घातलेली ज्वेलरी तब्बल ५५ कोटी रुपयांची होती. डायमंडच्या इअर रिंगची किंमत तब्बल २२ कोटी रुपये होती तर प्रियंकाने जी डायमंड रिंग घातली होती त्याची किंमत २३.२ कोटी रुपये होती. तसेच मधल्या बोटात घातलेल्या दोन अंगठीची किंमत सहा आणि दोन कोटी रुपये होती.