मुंबई: 'कॉमेडी नाईट्स विथ कपील' हा शो गाजवणारा कपील शर्मा लवकरच आपल्या नवा शो सुरु करत आहे.  हा नवा शो कधी सुरु होणार याची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 मार्चला एक मोठा इव्हेंट करून कपील आपल्या या नव्या शो ची घोषणा करेल, अशी माहिती मिळत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा शो सुरु होईल असं बोललं जातंय. 'सोनी' वाहिनीवर कपीलचा हा शो दिसणार आहे. कपीलच्या कमबॅकचे प्रोमोही आता शूट झाले आहेत. अर्जुन कपूर, करीना कपूर, विराट कोहली आणि सायना नेहवाल कमबॅकच्या या प्रोमोमध्ये दिसतील.