COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री नेहमी मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये कॉमेंट्रीची धुरा सांभाळत असला तरी यंदा तो क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. 


आपल्या बहारदार आणि दिल'खेचक' कमेंट्री करणारा पुष्कर यंदा डॅशिंग मुंबईकडून खेळणार आहे. डॅशिंग मुंबईचा तो उपकर्णधार असणार आहे. 


तो खूप चांगला कमेंट्रेर सोबत क्रिकेटरही आहे, असे माधव देवचक्के याने सांगितले.  ऑस्ट्रेलियात झालेल्या माई पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या सेलिब्रिटी क्रिकेट सामन्याची कमेंट्री पुष्करने केली होती. त्यावेळी सुनील गावस्कर यांनीही हसून त्याला दाद दिली होती.