राहुलचे असिनला वॅलेंटाईनचे खास सरप्राईज
आज जगभरात सर्वत्र वॅलेंटाईन दिवस म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा होतोय. नुकत्याच लग्न झालेल्या राहुल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेत्री असिन यांच्यासाठी हा वॅलेंटाईन खास आहे. लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच वॅलेंटाईन डे आहे.
मुंबई : आज जगभरात सर्वत्र वॅलेंटाईन दिवस म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा होतोय. नुकत्याच लग्न झालेल्या राहुल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेत्री असिन यांच्यासाठी हा वॅलेंटाईन खास आहे. लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच वॅलेंटाईन डे आहे.
या दिवशी राहुलने असिनला एक खास सरप्राईज दिलेय. वॅलेंटाईनचे सेलिब्रेशन म्हणून राहुलने संपूर्ण घर फुलांनी, गुलाबाच्या पाकळ्या तसेच मेणबत्त्यांनी सजवलेय. असिनसाठी हे मोठ सरप्राईजच होतं.
असिननं याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. गेल्या महिन्यात १९ जानेवारीला हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने राहुल आणि असिनचे लग्न झाले.