मुंबई : छोट्या पडद्यावरची सर्वात सुपर हिट शो, 'चक्रवर्ती अशोक सम्राट'मध्ये तुम्हाला आता नवा अशोका दिसणार आहे. या शोमध्ये अशोकाचं मोठं रूप तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत ही भूमिका सिद्धार्थ निगम साकारत होता, पण मोठ्या अशोकाच्या भूमिकेत मोहित रैना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलर्सवर सुरू असलेल्या या मालिकेत अशोकाची भूमिका युवा अभिनेता सिद्धार्थ निगम साकारतोय. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' टॉप रेटेड मालिका आहे.


मोहित रैनाही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आहे. मोहितने महादेव सिरियलमध्ये भगवान शिव शंकराची भूमिका पार पाडली आहे, लोकांमध्ये ही भूमिका लोकप्रिय होती.