मुंबई : महाड पूल दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत पुढची हानी रोखणारे देवदूत बसंत कुमार यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सन्मान केला. बसंत कुमार यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणतील पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी बसंत कुमार यांची राज यांच्याशी भेट घडवून आणली. याभेटी दरम्यान राज यांनी बसंत कुमार यांच्याशी केलेल्या 
चर्चेत दुर्घटनेची माहिती घेताना त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधानही जाणून घेतलं. 


स्वतः बसंत कुमार यांनी राज यांनी केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले.  दुर्घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गहिवरुन आलं. दरम्यान मनसेने याअपघाताबद्दल युती व आघाडीत नेत्यांना जबाबदार धरत कडाडून टीका केली. 


तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा हायवेवर दिव्यांची सुविधा, प्रत्येक पुलावर पोलिस चौकी आणि महामार्ग प्राधिकरण कर्मचा-यांची २४ तास गस्तीची आग्रही मागणी राज्यसरकारकडे केली आहे. गणेशोत्सवापूर्वी ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय.