जोधपूर : सोमवारी काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष सूटका केली. यानंतर सलमानला नक्कीच दिलासा मिळाला असेल. पण असं होतांना काही दिवस नाही आहे. सलमानच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे. आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकार आता सुप्रिम कोर्टात जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी वकिलांनी दुलानी याच्या साक्ष ही महत्त्वाची नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात प्रमुख साक्षीदार हरीश दुलानी आहे. दुलानी हा गायब असल्याचं म्हटलं जात होतं. दुलानी हा 1998 साली सलमानचा ड्रायव्हर होता. राजस्थान हायकोर्टने सलमानची निर्दोष सूटका केल्यानंतर या निर्णयावर त्यांने प्रश्न उपस्थित केले आहे. 


याआधी हरीश दुलानी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान गैरहजर होता. त्याने अनेकदा कोर्टाच्या समन्सकडे देखील दुर्लक्ष केलं होतं. तो म्हणतो आहे की माझा नाईलाज होता कारण मला धमक्या दिल्या जात होत्या. पण या निकालानंतर गायब असलेला हा साक्षीदार समोर आला आणि त्याने काही प्रश्न उपस्थित केले त्यामुळे सलमानच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.