सुपरस्टार रजनीकांतने दिला आमीर खानला मोठा झटका
बॉलिवूडचा मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खानला सुपरस्टार रजनीकांतने खूप मोठा झटका दिला आहे. रजनीकांतने आमिरच्या दंगल चित्रपटातील त्याच्या कॅरेक्टरला तमिळमध्ये डबमध्ये करण्यास नकार दिला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खानला सुपरस्टार रजनीकांतने खूप मोठा झटका दिला आहे. रजनीकांतने आमिरच्या दंगल चित्रपटातील त्याच्या कॅरेक्टरला तमिळमध्ये डबमध्ये करण्यास नकार दिला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांना चित्रपट खूप आवडला. पण त्यांनी खूप प्रेमाने याला नकार दिला आहे.
नुकतेच या चित्रपटाचे टायटल सॉन्ग रिलिज झाले आहे. आमिर खानचा दंगल हा हरियाणाचे पहेलवान महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे.
हा चित्रपट येत्या २३ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.