मुंबई : अभिनेता राजपाल यादवला अखेर तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. राजपालला ६  दिवसांचा कारावास होणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानेही राजपाल यादवाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राजपाल यादव ६ दिवसांसाठी जेलमध्ये जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजपाल यादवला १० दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण यापूर्वी तो ४ दिवस तुरूंगात राहून आल्याने, त्याला आणखी ६ दिवस तुरूंगात रहावं लागणार आहे.


राजपाल यादवने ५ वर्षांपूर्वी 'अता पता लापता' हा सिनेमा बनवण्यासाठी दिल्लीतील उद्योजक एम.जी आग्रवाल यांच्याकडून पाच कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र तो ते परत करू शकला नाही. 


उद्योजक एम.जी आग्रवाल यांनी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरोधात ५  कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप केला आणि न्यायालयात याचिका दाखल केली.


दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात राजपाल यादवला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु २०१३ साली राजपालने खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्याला १० दिवसांची शिक्षा ठोठावली.


यानंतर राजपाल यादवने ४ दिवसांचा तुरुंगवासही भोगला. त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती करुन त्याची ६ दिवसांची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने राजपालला दिल्ली बाहेर न जाण्यास सांगितले होते.