मुंबई :  कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाहून परतत असताना फ्लाइटमध्ये आपल्या टीम मेंबर्सला व्हिस्की पिऊन वाईट बोलणाऱ्या कपिल शर्मावर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे. कपिलच्या वागणुकीबद्ल सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी शोमधून बायकॉट केला. त्यामुळे कपिलला राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांना गेस्ट बोलवून शो करावा लागला. 


राजू श्रीवास्तव म्हणाला की, जनता सर्वोच्च स्थानी आहे. दारू वारूबद्दल माफी देऊ शकते, पण सुनील ग्रोवरशी गैरवर्तणूक करणे सहन नकरणार नाही. कपिलने मला सांगितले की तो सुनीलशी भेटण्याचा प्रयत्न करीत आहे पण तो यावेळी मुंबईत नाही आहे. 


असे म्हटले जात आहे की सुनील शोमध्ये परतणार नाही. सर्व काही सुरळीत होण्यासाठी त्याने आपल्या घरी एक मिटींग बोलावली आहे. कपिलची आई यात मध्यस्थी करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. आता पाहावे लागेल की कपिल आणि सुनीलच्या या भेटीनंतर पुन्हा सर्व काही सुरळीत होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.