मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. राखीच्या विरोधात लुधियानामध्ये वाल्मीकी ऋषींच्या अनुयायांच्या भावना दुखवल्याचा खटला सुरू आहे. याप्रकरणी 9 मार्च रोजी राखीला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण वारंवार समन्स बजावूनही राखी कोर्टात येत नसल्यानं तिच्या विरोधात व़ॉरंट जारी करण्यात आलं होतं. अखेर पंजाब पोलिसांनी मुंबईतून राखीला अटक केली आहे. याप्रकरणी १० एप्रिलला पुढची सुनावणी आहे.