मुंबई: राम गोपाल वर्माच्या वीरप्पन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भारतातला कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. कन्नड चित्रपट किलिंग वीरप्पनचा हा हिंदी रिमेक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओसामा बिन लादेनला मारायला 10 वर्ष लागली, पण वीरप्पनला मारायला 20 वर्ष लागली, असं या ट्रेलरमध्ये सांगण्यात आलं आहे. 


27 मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात संदीप भारद्वाज, सचिन जोशी, उशा जाधव, लिसा रे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. रामूच्या कारकिर्दीसाठीचा हा एक महत्त्वाचा सिनेमा मानला जात आहे. रामूचे गेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडले आहेत, त्यामुळे या चित्रपटाकडून रामूलाही बऱ्याच अपेक्षा आहेत. 


पाहा वीरप्पनचा ट्रेलर