मुंबई : मुंबई अग्निशमन दलाला एक नवीन चेहरा मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हूडा हा मुंबई अग्निशमन दलाचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. अग्निशमन दलात जास्तीत जास्त तरुणांनी स्वेच्छेने स्वयंसेवक म्हणून पुढे यावे,  असा त्यांच्या प्रयत्न असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले अनेक दिवस मुंबई अग्निशमन दल एका ब्रँड अॅम्बेसेडरच्या शोधात होतं. यावर अनेक अभिनेत्यांच्या नावाचा विचार केला जात होता. पण, शेवटी रणदीपच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 


१४ एप्रिलपासून रणदीप त्याच्या कॅम्पेनला सुरुवात करेल. त्याच्या या कॅम्पेनमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या ७,००० वरुन ७०,००० इतकी होणं अपेक्षित आहे. रणदीपने ट्विटरवर त्याच्या या नवीन इनिंगची घोषणा केली. 




रणदीप हूडाचा 'सरबजीत' हा सिनेमा येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे.