VIDEO : कंगना म्हणतेय `ब्लडी हेल`
मुंबई : 'ब्लडी हेल' हे रंगूनमधलं नवं गाणं नुकतच रिलीज झालंय. यात कंगनाचा एक बोल्ड अंदाज पहायला मिळतोय.
बॉलिवूडची क्वीन कंगना मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपली नवी फिल्म घेऊन येतेय. रंगून या फिल्ममध्ये कंगणाचा आणखी एक नवा लूक पहायला मिळणार आहे.
कंगनाने आतापर्यंत वेगवेगळ्या फिल्म्समधून आपली एक वेगळी छबी प्रेक्षकांपुढे आणलीय.
क्वीननंतर कंगनाची गाडी बॉलिवूडमध्ये सुसाट सुटलीय. त्यातच राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवल्यानंतर आता कंगनाच्या यापुढच्या फिल्म्स कशा असतील याची तिच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे.