मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी हिला पाहून तुम्हालाही बरेच दिवस झाले असतील ना... पण, आता मात्र राणीला कॅमेऱ्यांनी टिपलंच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ जुलै रोजी राणीनं परदेशातून मुंबईत आगमन केलं तेव्हा मुंबई विमानतळावर उतरली असताना कॅमेऱ्यात कैद झालीय. 


सध्या अशी दिसतेय राणी 

३८ वर्षीय राणी आई बनल्यानंतर स्वत:ला आणि आपल्या चिमुरड्या आदिराला कॅमेऱ्यापासून दूरच ठेवणं पसंत करत होती. 


२०१४ साली राणी आदित्य चोप्रासोबत विवाहबंधनात अडकली. आदित्यच्या 'बेफिक्रे' या सिनेमाच्या शूटसाठी तो पॅरिसमध्ये असताना राणीही तिथेच राहिली.... आता या सिनेमाचं शूटींग पूर्ण झाल्यानंतर राणी भारतात परतलीय.