मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी बेफिक्रेच्या टीमसोबत दिसली होती. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता राणी मुखर्जीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर राणी आणि आदित्यची मुलगी आदिरा हिचे फोटो शेअर करण्यात आलेत. जन्मानंतर पहिल्यांदाच आदिराचे फोटो समोर आलेत. 


गेल्या वर्षी नऊ डिसेंबरला राणीने आदिराला जन्म दिला. त्यानंतर राणी बॉलीवूडच्या लाईमलाईटपासून दूर होती. आदिरा आता ७ महिन्यांची झालीये.