नवी दिल्ली : दीपिका पदुकोण आगामी हॉलीवूड चित्रपट 'ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ एक्स जेंडर केज' च्या शूटिंगसाठी कॅनडासाठी रवाना झाली. अभिनेता रणवीर सिंह याने ही माहिती दिली. याशिवाय मला दीपिकाचा अभिमान आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच आगामी हॉलीवूड चित्रपटातही ती चांगले काम करेल. चित्रपटासाठी माझ्या तिला शुभेच्छा असं रणवीर यावेळी म्हणाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रिपल एक्स या चित्रपटाद्वारे दीपिका हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. यासाठी ती मोठी मेहनतही घेतेय. नुकताच तिचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. यात ती जिममध्ये पुशअप करताना दिसतेय. याशिवाय या चित्रपटातील फर्स्ट लूकही वायरल झाला होता. 


या चित्रपटात दीपिका हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डीजलसोबत काम करतेय. दीपिकाचा हा पहिला हॉलीवूड चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित होणार आहे.