मुंबई : आपल्या करामती शैलीसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता रणवीर सिंह 'सुलतान'च्या गाण्यावर थिएटरमध्येच जोरदार थिरकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीरला 'सुलतान' सिनेमा एवढा आवडला की तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि जागेवरच नेहमीप्रमाणे धिंगाणा सुरु केला. 'सुलतान'मधील ‘बेबी को बेस पसंद हैं’ हे गाणं लागल्यानंतर रणवीरने थिएटरमध्येच नाचायला सुरुवात केली.


रणवीर सध्या 'बेफिक्रे'च्या शुटींगसाठी पॅरिसमध्ये आहे. तिथे त्याने सुलतान पाहिला. यावेळी रणवीरला पाहून थिएटरमधील प्रेक्षकांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.