मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या अफेअरच्या चर्चा होतच आहेत. पण, या दोघांनी मात्र या चर्चांना कधीच अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी त्यांच्या काही अॅक्शन्समुळे आता त्यांच्यातील संबंधांची खात्री सर्वांना पटली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी सिने अॅवॉर्ड्स २०१६' मध्ये रणवीरला बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर दीपिकाला ज्युरीज चॉईस आणि व्ह्युअर्स चॉईस असे दोन पुरस्कार मिळाले. हे अवॉर्ड घेण्यासाठी दीपिका परदेशात एका हॉलिवूड फिल्ममध्ये व्यस्त असल्याने येऊ शकली नाही. 


रणवीरने तिच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारले. पहिला पुरस्कार स्वीकारताना रणवीरने स्टेजवर जाऊन तिच्याविषयी एक छान भाषण दिेले ज्यात त्याने दीपिकाचे तोंड भरुन कौतुक केले. पण, जेव्हा तिच्या दुसऱ्या पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा मात्र त्याने दीपिकासाठी काहीतरी स्पेशल केले ज्याने उपस्थितांचे मन जिंकले. 


दुसरा पुरस्कार घोषित होताच रणवीरने कॅनडात असलेल्या दीपिकाला एक व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी ती सेटवर शूटिंगमध्ये होती. रणवीरने त्याचा फोन माईककडे धरला. दीपिकाने उपस्थित सर्वांचे सर्वांचे आभार मानले. 


फिल्मफेअर पुरस्कारांमध्येही जेव्हा दीपिकाने 'पिकू'साठी बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार जिंकला तेव्हाही तो उभा राहून तिच्यासाठी जोरजोरात ओरडत होता. आणि रणवीरला जेव्हा बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला तेव्हा तिच्याही डोळ्यांतून येणारे आनंदाश्रू सर्वांनी पाहिले होते.