मुंबई : 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' हा मराठी चित्रपट आजा रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगनं शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैभव तत्ववादीनं नुकतंच रणवीरबरोबर बाजीराव मस्तानीमध्ये काम केलं होतं. या चित्रपटामध्ये वैभव रणवीर म्हणजेच बाजीरावांचा भाऊ चिमाजी अप्पांच्या भूमिकेमध्ये होता. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, आणि म्हणूनच वैभवच्या या चित्रपटाला रणवीरनं शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेक्षकांनी 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' पहावा असं आवाहनही रणवीरनं त्याच्या फॅन्सना केलं आहे.