दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती करण्याची रितेशची इच्छा
मराठी सिनेमातील ‘बालक पालक’,‘लय भारी’ या हिट सिनेमांच्या निर्मितीनंतर आता दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती करण्याची इच्छा रितेश देशमुखने व्यक्त केली आहे.
मुंबई : मराठी सिनेमातील ‘बालक पालक’,‘लय भारी’ या हिट सिनेमांच्या निर्मितीनंतर आता दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती करण्याची इच्छा रितेश देशमुखने व्यक्त केली आहे.
प्रादेशिक सिनेमांची गरज ओळखणं गरजेचं आहे. मराठी सिनेमा सध्या बदलत आहे.
तसंच प्रादेशिक भाषांमध्येही सिनेमा निर्मिती झाली तर त्या भाषांतील सिनेमे देखील चालतील, असा विश्वास रितेशने व्यक्त केलाय. लवकरचं तो आता इतर प्रादेशिक भाषांमध्येही चित्रपट निर्मिती करणार आहे.