अवैध बांधकामप्रकरणी कपील शर्माला तात्पुरता दिलासा
हास्य कलाकार कपील शर्मा याने केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामा विरोधात १७ जानेवारी पर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
मुंबई : हास्य कलाकार कपील शर्मा याने केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामा विरोधात १७ जानेवारी पर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
कपील शर्मावर काय आणि कोणत्या आधारे कारवाई केली याबाबत बीएमसी मार्फत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. यानुसार कपील शर्माला पाठवलेली नोटीस ही योग्य असून त्याने नियम मोडलेत त्याआधारे कपीलवर मोठ्या दंडात्मक स्वरुपाची कारवाई केली जावी असेही बीएमसी ने स्पष्ट केले आहे.
त्यावर बीएमसीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यास आणि आपले म्हणणे मांडण्यास कपील शर्माच्या वकीलांनी १७ जानेवारीपर्यंतची वेळ मागितली होती. त्यानुसार आता पुढील सुनावणी १७ जानेवारी दिवशी ठेवण्यात आली आहे.