मुंबई : स्टार प्लसवरील 'कसोटी जिंदगी ही' सीरियल तुम्हाला आठवते का? या मालिकेत अनुराग बासूची प्रमुख भूमिका सेझान खान याने केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सीरियल चांगलीच लोकप्रिय झाली होती.गेल्या अनेक वर्षांपासून अनुराग बासू उर्फ सेझान खान छोट्या पडद्यापासून दूर होता. बऱ्याच कालावधीनंतर तो आता पुन्हा परततोय.


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अँड टीव्ही चॅनेलवरील 'गंगा' या मालिकेत तो लवकरच दिसणार आहे. रुद्र नावाची व्यक्तिरेखा तो साकारणार आहे जो हायप्रोफाईल बिझनेसमन आहे. 


कसोटी जिंदगी कीसोबतच सेझानने हसरते, दुश्मन, पलछीन, एक लडकी अंजानीसी, सीता और गीता यातही काम केले होते.