मुंबई : जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने विराटचं लग्नाचं प्रपोजल नाकारल्यानंतर दोघांनी ठरवलं की आता वेगळं व्हायचं.  दोघांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. 


क्रिकेटर आणि अभिनेत्री यांच्यातील रोमान्सचा सिलसिला खूप जुना आहे. त्यातील सात जोड्याचे सूर जुळले आणि नंतर ते वेगळे झाले. 


१) संगीता बिजलानी आणि मोहम्मद अजझरुद्दीन 
अझरने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संगीताशी लग्न केले. त्यांचा संसार १४ वर्ष चालला. पण ज्वालागुट्टा हिच्याशी जवळीक वाढल्याने संगीताने अझरला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. 


२) रिचर्ड्स आणि नीना गुप्ता 
रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचे सूर जुळले. त्यांचे नाते हे लग्नाच्या पलिकडे होते. त्यांना दोघांना मिस्बाह गुप्ता नावाची मुलगी झाली. दोघांचा ब्रेकअप झाला पण नीनाने मुलाला वाढविण्याचा निर्णय घेतला. 


३) रिना रॉय आणि मोहसीन खान 


रिना रॉय हिचे लग्न झालेल्या शत्रूघ्न सिन्हा यांच्यासी अफेअर होते. पण तिचे मन शॉर्टगन सिन्हाने तोडल्यानंतर तिला पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानमध्ये प्रेम सापडले. तिने आपले चित्रपट करिअर सोडले, पण दोघांचे काही पटले नाही, दोघांनी वेगळ होण्याच निर्णय घेतला. 


४) सौरव गांगुली आणि नगमा 
सौरव गांगुली विवाहित असताना त्याचे आणि नगमाचे अफेअर असल्याची चर्चा होती. त्यांनी कधी आपले प्रेम जगजाहीर केले नाही. 


५) रवी शास्त्री आणि अमृता सिंग 


अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्या प्रेमाचा वसंत फुलण्यापूर्वी अमृताचे सूर हे रवी शास्त्री सोबत जुळले होते. ती रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी झाली होती. पण कालांतराने दोघांचा ब्रेकअप झाला. 


६) युवराज सिंग आणि किम शर्मा 


भारतीय क्रिकेट आणि बॉलिवूडमधील ही खूप स्ट्रॉग जोडी होती. त्यांनी एकमेकांना २००३पासून डेटिंग करण्यास सुरूवात झाली. ते दिसले त्याच दरम्यान. त्याची लव स्टोरी ४ वर्ष होती. नंतर त्यांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. 


७) झहीर खान आणि इशा शेरवानी


ईशा आणि झहीरचे प्रेम प्रकरण २००४मध्ये समोर आले. ईशाचे बॉलीवूड करिअर सुरू झाले तेव्हा झहीर खान हा भारताचा सर्वात आवडता बॉलर होता. त्यांनी एकमेंका ८ वर्ष डेटिंग केलं. पण मग त्यांचा ब्रेकअप झाला.