नवी दिल्ली :  तामिळ अभिनेत्री आणि मॉडेल लक्ष्मी राय हिने भारतीय क्रिकेट टीम कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.  हा काळ आणि संबंध माझ्या आयुष्यातील काळा डाग आहे. 


खपली काढली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे संबंध संपून बराच काळ गेला तरी ही अभिनेत्री पुन्हा जुनी खपली काढण्याचे काम करत आहे.


कसा निघाला विषय...


एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मी राय म्हणाली, माझे आणि धोनीचे संबंध एका काळ्या डागाप्रमाणे होते. तो बऱ्याच काळ माझ्या आयुष्यातून डाग जाणार नाही. मी हैराण आहे की लोकांना या संबंधबद्दल बोलण्याला सवड आणि धैर्य आहे.  प्रत्येकवेळी टीव्ही चॅनल धोनीच्या मागील आयुष्यात डोकावतात आणि नंतर आमच्या संबंधावर चर्चा करतात. मी घाबरते की माझे मुलं या सर्व गोष्टी टीव्हीवर पाहतील आणि मला विचारतील. 


धोनी शिवाय इतरांशी संबंध...


धोनीनंतर माझे तीन किंवा चार पुरूषांशी संबंध होते पण त्यावर कोणाचे लक्ष नाही फक्त धोनीसोबतचे संबंध सर्वांना माहिती आहे. 


आमच्या संबंधाला नाव दिले गेले असते पण... 


आमच्या संबंधाला एक चांगले नाव दिले जाऊ शकले असते. पण आता ते शक्य नाही. तो आयुष्यात खूप पुढे गेला आहे. आम्ही एकमेकांची खूप इज्जत करतो. आम्ही काहणी संपली आहे. मी आता आपल्या अभिनयावर फोकस करत आहे.