मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनं बॉलिवूडचे अनेक सीक्रेटस् उघड केलेत. आपल्या आजपर्यंतच्या बॉलिवूडच्या प्रवासात आलेले अनेक कटू अनुभव तिनं शेअर केलेत.


रिचाचा अनुभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याअगोदर दिल्लीत आपल्या आईवडीलांसोबत राहत असताना मी खूप सुंदर आणि बुद्धीमान आहे असं मला वाटायचं... पण, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर मात्र आत्मविश्वास कमी आहे की काय असं वाटू लागलं, असं रिचा सांगतेय... याला कारणंही तशीच होती. 


सल्ल्यांवर सल्ले... 


बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अनेक सल्ले तिला न मागताच मिळायला लागले... कधी वजन वाढव, कधी वजन कमी कर, कधी नाक आणि ओठ ठिक करून घे... केस वाढव... फॅट घटव... आयलॅशेज एक्सटेन्शन कर... हिल्स परिधान कर.... बोलत असताना तोंडाचा 'पाऊट' कर...असे एक ना अनेक... 


निराशा आणि तुम्ही  


अशावेळी दबावाखाली येऊन तुम्ही तुमचं जेवणं कमी करता... आणि प्रत्येक वेळी हाच विचार करत असता की तुम्ही कसे दिसताय... अशा वेळी निराशेनं तुम्हाला घेरलं तर आश्चर्य वाटायला नको... आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला होता, असंही रिचानं म्हटलंय. 


नकारात्मकता नेहमीचीच... 


एखाद्या अभिनेत्याला - अभिनेत्रीला अनेक स्तरांवर रिजेक्शन सहन करावे लागतात, असं रिचा म्हणतेय.


रिचा चड्ढा कॅबरे, सरबजीत, गँग्स ऑफ वासेपूर, फुकरे, मसान, ओए लक्की लक्की ओए यांसारख्या सिनेमांत काम केलंय. रिचा 'टेडएक्स टाल्क्स प्लॅटफॉर्म'वर आपले अनुभव शेअर करत होती.