मुंबई : कॅबरे या सिनेमात रिचा चढ्ढा भूमिका साकारणार आहे, हा सिनेमा हेलन यांच्या जीवनावर आधारीत असल्याची चर्चा आहे, यासाठी रिचाची मेहनत महत्वाची मानली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मॅगेझिनसाठी रिचाने हे फोटोशूट केल्याचं सांगण्यात येतंय. या बरोबर तुम्हाला 'सरबजित' सिनेमातही रिचाचा अभिनय पाहायला मिळणार आहे.


रिचा या आधी 'गँग्ज ऑफ वासेपूर' सिनेमातून उजेडात आली होती, त्यानंतर मसान सिनेमातही तिने बोल्ड भूमिका साकारली. 'मैं और चार्ल्स' या सिनेमातही रिचाने महत्वपूर्ण भूमिका साकारली.