मुंबई : सैराटमुळे प्रसिद्धीला आलेली आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या जोडीने बॉलीवूडपासून हिंदी शोजनाही भुरळ घातलीये. अनेक हिंदी शोजमध्येही ही सैराटची टीम दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच या जोडीने सो यू थिंक यू कॅन डान्स या डान्स रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कलाकारांच्या परफॉर्मन्सना दाद दिली. 


तसेच झिंगाट या गाण्यावर शोमधील कलाकारासह सगळ्यांनीच ताल धरला. कपिल शर्माच्या शोनंतर यू कॅन डान्स या शोमध्ये सैराटची टीम दिसणार आहे.