मुंबई : संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणारा सैराटने नुकताच बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींचा टप्पा पार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतक्या कमी कालावधीत विक्रमांची उंची गाठणारा सैराट शंभर कोटीचा मैलाचा दगड गाठण्याच्या मार्गावर आहे. सैराटला मिळालेल्या यशाबद्दल नुकतीच सक्सेस पार्टी झाली. 


यावेळी या यशाबद्दल आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी प्रतिक्रिया दिल्या. इतकं मोठं यश मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती. मात्र मिळालेल्या यशाने खूप खुश आहोत, असे रिंकू-आकाशने सांगितले. 


तसेच चाहत्यांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले. यावेळी दुबईतील आठवणीही त्यांनी शेअर केल्या.