मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सैराटच्या आर्चीची जादू अजूनही कायम आहे. सैराट सिनेमानंतर आर्ची आणि सैराटची टीम महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार प्रसिद्ध झाले. रिंकू राजगुरू चित्रपटात काम करण्याआधी कशी होती आणि आता तिच्यात किती बदल झाला आहे हे तिच्या आधीच्या आणि आताच्या काही फोटोसवरुन तुम्हाला कळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रात्रीत स्टार आणि असंख्य प्रेक्षकांचं अभिनयातून मन जिंकणारी आर्ची आज घराघरात पोहोचली आहे. रिंकूने 'सैराट'मध्ये कामकरण्यासाठी स्वत:मध्ये बदल केले. तिचे डायलॉग, डान्स यावर तर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील फिदा झाले.


रिंकूच्या अभिनयाचे कौतुक आमीर खान, माधुरी दीक्षित यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी देखील केलं. हीच रिंकू आपल्याला आता एकदमच वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. 'सैराट' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रिंकू सगळीकडेच आर्चीच्या रुपात दिसत आहे.



सलवार-कुर्ता, ओढणी, केसांची वेणी अशाच अंदाजात तिला सर्वांनी आत्तापर्यंत पाहिले होतं पण आता रिंकू ही आता सैराट गर्ल झाली आहे. व्हाइट कलरचा सिल्क पंजाबी गळ्यात स्टायलिश ओढणी, मोकळे केस अन मेकअपचा टच देऊन रिंकू मॉडर्न लूकमध्ये आली आहे. तिच्या या लूकला सोशल मीडियावर हजारो लाइक्स मिळतायंत. रिंकूचा नवा सिनेमा आणि त्या सिनेमात रिंकू कोणत्या लूकमध्ये दिसेल याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल.