रितेशच्या बेंजोमध्ये आर्ची पाहुणी कलाकार?
संपूर्ण महाराष्ट्राला याडं लावणाऱ्या सैराटचा डंका सध्या सर्वत्र वाजतोय. सैराटच्या सुस्साट यशामुळे या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनाही मोठी प्रसिद्धी मिळालीये.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला याडं लावणाऱ्या सैराटचा डंका सध्या सर्वत्र वाजतोय. सैराटच्या सुस्साट यशामुळे या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनाही मोठी प्रसिद्धी मिळालीये.
आर्ची आणि परश्याची भूमिका साकारणारे रिंकू आणि आकाशलाही मोठी लोकप्रियता मिळतेय. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जातेय.
रिंकूला तर या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष उल्लेखनीय राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तिच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. त्यानंतर आता सैराटची आर्ची लवकरच रवी जाधव दिग्दर्शित बेंजो या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. याबाबतच्या चर्चा सुरु आहेत.
त्यामुळे आर्चीची रांगडी भूमिका साकारणारी रिंकू बेंजोमध्ये कसा अभिनय करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बें