मुंबई : सैराट सिनेमामध्ये आपल्या अभिनयातून अनेकांच्या मनावर छाप सोडलेल्या रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. 


रिंकूला झालं एका गोष्टीचं दु:ख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटमधून पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या रिंकूला अभिनय जमणार की नाही याबाबत अनेकांना प्रश्न असला तरी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना याबाबत कधीच शंका नव्हती. म्हणून रिंकू म्हणते की, या सगळ्या प्रवासात माझ्या सोबत खंबीरपणे राहिलेला नागराज दादा काल सोबत नव्हता याचे मला फार दुःख झाले.


आई-वडिलांच्या डोळ्यात आलं पाणी


'सैराट' सिनेमातून प्रसिद्धीस आलेल्या रिंकूला पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रिंकूचे वडील महादेव राजगुरु आणि आई आशा राजगुरु देखील दिल्लीला तिच्यासोबत गेले होते. राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिंकू जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे गेली तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.