रिगल थिएटरसंदर्भात ऋषी कपूर झाले भावुक
दिल्लीतील प्रसिध्द रीगन थिएटर आज बंद होणार असल्याने त्याच्याविषयी आपल्या आठवणी रिषी कपूरने ट्विटरवर शेअर केल्या.
मुंबई: दिल्लीतील प्रसिध्द रीगन थिएटर आज बंद होणार असल्याने त्याच्याविषयी आपल्या आठवणी रिषी कपूरने ट्विटरवर शेअर केल्या.
हे थिएटर बॉलिवूडच्या गेल्या आठ दशकातील वेगवेगळ्या आठवणींचा साक्षीदार आहे.
या थिएटरच्या मालकांनी शेवटच्या दिवशी ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांच्या काही चित्रपटांचा शो ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तिकडे आज 'मेरा नाम जोकर' आणि 'संगम' या चित्रपटाचे शो असतील.
'दिल्लीचं एडीयस रीगल थिएटर बंद होत आहे. ही एक अशी जागा आहे जिथे कपूर परिवाराचे सगळे चित्रपट आणि नाटक प्रदर्शित केले गेले.
'बॉबी'चा प्रिमीअरही इथेच झाला होता.' अश्या पोस्टसहीत ऋषी कपूरनी थिएटरचा फोटोही ट्विट केला.