मुंबई : आपल्या बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी पुन्हा ट्विटरवर आपलं एक छोटंसं मत व्यक्त केलंय... पण, त्याचा फटका एका मोठ्या ब्रॅन्डला मात्र बसणार असं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झारा' या ब्रॅन्डनं आपलं काही नवीन कलेक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ऋषी कपूर यांना या ब्रॅन्डची प्रमोशनल स्ट्रॅटेजी आणि डिझाईन्स काही फारशी रुचलेली दिसत नाहीत. मग काय... त्यांची 'मन की बात' सोशल मीडियावर येऊन धडकली... आणि या ब्रॅन्डचे धाबे दणाणले. 


'लो-हाय टॉप' आणि 'रिब्ड जीन्स' अशा काही थीमचे कपडे 'झारा'नं प्रदर्शित केले होते. यावर कमेंट करतना ऋषी कपूर यांनी 'या दोघांसोबत एक भीक मागण्याचा कटोरा फ्री' अशी कमेंट टाकली.



उल्लेखनीय म्हणजे ऋषी कपूर यांचं हे ट्विट आत्तापर्यंत १.५ लाखांहून जास्त लोकांनी रिट्विट केलंय. यामध्ये करण जोहरचाही समावेश आहे.