मुंबई : दुसऱ्यांदा आईपणाचा आनंद सेलिब्रेट करणारी जेनेलिया आणि तिच्या नवजात बालकाची पहिली झलक आज पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच, बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डीसूझा हिनं आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिलाय. त्यानंतर जेनेलियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय.


यानंतर, पहिल्यांदाच कॅमेऱ्यानं टिपलेली जेनेलिया खुपच आनंदी दिसतेय. तिच्यासोबत तिचा पती रितेश देशमुख आपल्या पहिल्या मुलाला हातात घेऊन उभा आहे... आणि रितेशच्या आईनं नवजात बालकाला आपल्या हातात घेतलेलं या फोटोत दिसतंय.