मुंबई : दुसऱ्यांदा बाप बनलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपला आनंद शेअर त्याच्या चाहत्यांसोबतही शेअर केलाय. यावेळी, मुलगा आणि आपल्या पत्नीची तब्येत एकदम ठिक असल्याचं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३७ वर्षीय रितेशनं गुरुवारी ट्विटरवर आपली पत्नी जेनेलिया डिसूजा आणि बाळ दोन्हीही तंदूरुस्त असल्याचं म्हटलंय. 'तुमच्या शुभकामना आणि प्रेमासाठी धन्यवाद... जच्चा-बच्चा दोन्हीही एकदम खुशाल आहे... आनंद, प्रेम!' असं रितेशनं ट्विटरवर म्हटलंय. 


बुधवारी आपल्या दुसऱ्या अपत्याच्या जन्माची बातमी रितेशनं सोशल मीडियावर दिली होती. रितेश आणि जेनेलिया २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या जोडप्याचं पहिलं अपत्या रिआनचा २०१४ मध्ये जन्म झाला होता.