मुंबई : जेनेलियाने मराठी चित्रपटात काम करावे असे स्वप्न अभिनेता रितेश देशमुखचं आहे.  'आजपर्यंतची ती माझी सर्वात फेवरेट को स्टार राहिली आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो,' असं रितेश म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'मला तिच्यासोबत मराठी चित्रपट करायचा आहे, कारण यापूर्वी तिने अनेक भाषेमध्ये चित्रपट केले आहेत. त्यामुळे जेनेलियासोबत मराठी चित्रपट बनवण्याचे माझे स्वप्न आहे,' असेही रितेशने सांगितले. 


 रितेश आणि जेनेलिया पुन्हा एकत्र कधी काम करणारा असा प्रश्न रितेशला विचारला होता, त्यावर रितेश बोलत होता.


रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह २०१२ मध्ये झाला. त्यांना पहिला मुलगा रियान नोव्हेंबर २०१४ मध्ये झाला तर दुसऱा मुलगा १ जून २०१६ मध्ये झाला आहे.