सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील सिनेमाचा पहिला टीझर
बहुचर्चित ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित सिनेमाचा टिझर आज रिलीज करण्यात आला.
मुंबई : बहुचर्चित ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित सिनेमाचा टिझर आज रिलीज करण्यात आला.
कोण करणार सचिनची भूमिका
सचिनने हा टिझर आपल्या सोशल अकाऊंटवर शेअऱ केला आहे. आपल्या लाडक्या सचिनच्या जीवनावर आधारित सिनेमा येत आहे याचा आनंद प्रत्येकालाच आहे. सचिन तेंडुलकर स्वतः या सिनेमात आपली भूमिका साकारणार आहे.
सचिनला आवाज कोणाचा...
सचिनच्या वडिलांनी त्याला लहानपणी दिलेली शिकवण त्याने आपल्या आयुष्यात तंतोतंत पाळली. मेरे बाबा हमेशा कहते थे, तुम्हने जिंदगी मैं क्रिकेट को चुना है,ये एक बात है। लेकिन आखिर तक जो बात तुम्हारे साथ रहेगी, वो ये होगी की तुम इन्सान कैसे हो। आणि अगदी याच विचाराने सचिन तेंडुलकर आयुष्य जगत आहे.
ए. आर. रेहमानचं संगीत
या टिझरमध्ये सचिनचं बालपण दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर त्याची मैदानावर असलेली जादू आणि क्रिकेट प्रेमींनी सचिनवर केलेलं भरभरून प्रेम हे या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाला प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांनी संगीत दिलं आहे.
बायोपिकचं भरघोस 'पीक'
धोनी, अझहरूद्दीन यांच्यावर सिनेमे येत असतानाच क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या जीवनावर सिनेमा येत आहे ही खूप आनंदाची बाब आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीनं हा सिनेमा बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
पाहा चित्रपटाचं पहिलं टिझर