मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या अजय आणि काजोलसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. 


पाहा व्हिडिओ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिंघमच्या भूमिकेत भाऊ कदमने तर जयकांत शिकरेच्या भूमिकेत सागर कारंडेने विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. याशिवाय थुकरटवाडीच्या कोर्टात अजय आणि काजोल दोघांनाही आरोपीच्या पिंज-यात बसवून त्यांच्यावर अनेक मजेदार आरोपही करण्यात आले. 


यावेळी कलाकारांचा अतरंगीपणा बघून अजय आणि काजोल दोघांचीही हसून हसून पुरेवाट लागली. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. या दोघांचं हे मराठमोळं रुप येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणा-या चला हवा येऊ द्या च्या दोन्ही भागांमधून बघायला मिळेल.